
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्वच्छ राळेगाव,सुंदर राळेगाव,रोगमुक्त राळेगाव हे माझे ध्येय आहे,ते मी पुर्ण करणारच,मात्र त्या साठी नागरिकांचे मनापासून सहकार्य अपेक्षीत आहे.असे बोल राळेगाव पंचायतचे नूतन मुख्याधिकारी गिरिश पारेकर यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना काढले.नूतन मुख्याधिकारी पारेकर यानी पदभार स्वीकारल्या नंतर आमच्या प्रतिनिधिनी त्यांचेशी संवाद साधला,त्यावेळी स्वच्छ,सुंदर व रोगमुक्त राळेगाव माझ्या कारकीर्दीत नक्की होईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.राळेगाव शहर,नागरिकांच्या समस्या,विकासकामांची आखणी,प्रशासकीय काम्काजतिल दिरंगाई,दाखले वेळेत न मिळणे आदि विषयावर पारेकर यानी मार्गदर्शन केले.राळेगाव कराना मुख्य अपेक्षा आहे ती डम्पिन्ग ग्राउंडला कम्पाउंड घालण्याची,त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल,असे पारेकर यानी सांगितले.विशेष म्हणजे आता पर्यंत राळेगाव पंचायत कडे प्रभारी मुख्याधिकारी होते.त्यामूळे अधिकार्यांच्या आडमुठेपणामुळे विकासकामाना खीळ बसली होती.आता पुर्ण वेळ प्रशासक लाभल्यामुळे प्रशासनास गती येईल,लोकांचे प्रश्न मार्गी लागतील व गुणवत्तापुर्ण विकासकामे होतील,अशी आशा नागरिक बाळगून आहेत.मात्र नागरिकांना घर पट्टी,पाणी पट्टी,गाळे भाडे वेळेत भरण्याचे आवाहन पारेकर यानी केले आहे.
