ढाणकी शहरातील एका मल्टीस्टेट पतसंस्थेत कर्मचाऱ्यांची अंतर्गत बंडाळी बसू शकते गुंतवणुकदाराच्या उरावरी??


प्रति::प्रवीण जोशी
ढाणकी


मल्टीस्टेट अर्बन बँक पतसंस्थेवर आता अजिबात सर्व सामन्याचा विश्वास राहिला नाही. महाराष्ट्र राज्यात कुठे ना कुठे एका तरी पतसंस्थेने आर्थिक घोटाळा केल्याचं आपल्याला वर्तमान पत्रातून वाचण्यात येते. ढानकी शहरात सुद्धा हा लुटीचा बाजार येऊन वसला. फसवणूक करणारी मंडळी ग्राहका प्रती गद्दार निघाली. एका ठिकाणी तर दिवाळी निमित्त ठेवीदारांना सस्नेह भेट म्हणून वस्तू दिल्या पण बोर देऊन आवळा काढणारी ही मंडळी लूट करण्यासाठीच विविध ठिकाणी शाखा स्थापन करतात?? यांना ठेवीदारांशी काहीही घेणे देणे नाही.फक्त ठेव येऊ दया कर्ज देण्यास ढानकी येथील एक मल्टीस्टेट पतसंस्थेला जीवावर येते हे विशेष.काही दिवसात तीन शाखा प्रबंधक बदलून जातात तिथं काय आर्थिक फसवणूक झाली की काय असे ठेवीदारांना वाटने साहजिक आहे. तेव्हा ग्राहकांनी सुद्धा आता सावध राहणे गरजेचे बनले. थोडासा दुर्लक्षितपणा रकमेच्या अंगलट येऊ शकते.

चेले चपाटे सुद्धा अत्यंत चतुर असतात बरोबर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हेरुन त्यांना अधिक व्याज दर देऊ अशा भुलथापा भावनिक करून या बाबीचा फायदा घेऊन गुंतवणूक करायला लावत आहेत. ईथ सुद्धा ठेवीदारांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एरवी एक मल्टीस्टेट पतसंस्था ही अगदी अचूक वेळेवर बंद होत होती ती गेल्या काही दिवसापासून उशिरापर्यंत व्यवहाराचा ताळेबंद जुळवण्यासाठी सुरू असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आर्थिक सूत्र जुळायला तयार नाही त्यामुळे गुंतवणूकदाराणा फटका बसू शकतो. एका ठिकाणी तर एक दैनंदिन रक्कम वसूल करता स्थानिक कर्मचारी एक बाहेर गावातील कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात दहशत असून त्याच्या म्हणण्यानुसार एखादा कर्मचारी व्यक्ती नाही वागला तर तुझी आम्ही बदली करू किंवा आर्थिक हिशोबात घोळ आणून त्यात गुंतवू अशी चर्चा मोठ्या प्रमाणात असते. वरिष्ठांचा आम्हाला पाठिंबा असून आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही असे त्यांना वाटते?? ते दोन कर्मचारी वरिष्ठांची मर्जी दाखवून दहशत निर्माण करताय त्या कर्मचाऱ्यांची का बद्दली होत नाही हे एक रहस्य बनले. एक रक्कम वसूलकरता जो गोड बोलून “डॉन” बनला त्यांची दहशत मल्टीस्टेट पतसंस्थांचे वरिष्ठ अधिकारी संपवतील??येणाऱ्या काळात या सर्वाचे परिमाण त्या पतसंस्थेवर होऊन ती नक्कीच डबघाईला येऊन ग्राहकांची फसवणूक होऊ शकते हे नाकारून चालणार नाही.तेव्हा ग्राहकांनी सतर्क राहून गुंतवणूक करण्याची गरज बनली.