विदर्भ आणि मराठवाडा मध्यबिंदू ओळखले जाणारे सहस्त्रकुंड धबधबा अतिशय मनमोहक, पाहण्यासाठी नागरिकाची गर्दी

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड


सततच्या मुसळधार झालेल्या पावसामुळे आज दिनांक 23/जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाडा मध्यंबिंदूचा टोक म्हणून ओळखले जाणारे सहस्त्रकुंड धबधबा हा अतिशय मनमोहक दिसत असुन तो पाहण्यासाठी अनेक जिल्ह्यामधून नागरिकाची गर्दी होत आहे, उंच. उंच असे उडणारे थुवारे पाण्याच्या प्रवाहात उसळत येणाऱ्या लाटा, अंदाजे 30ते 40फूट उंची वरून कोसळणारा हा धबधबा आपले खरे रूप रोद्र धारण करतो.नदीच्या अलीकडच्या कोसळणाऱ्या धारेच्या हा सर्वात मोठा. धबधबा आहे डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले वेगळे रूप दाखवतो सहस्त्रकुंड. धबधबा अगदी सहज 15ते 20फुटावरून पाहता येतो त्याच बरोबर धबधब्या जवळ एक असलेल्या पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे अनेक जिल्ह्यातील भाविक भक्त तेथे महादेवाचे दर्शन घेऊन थोडा वेळ विश्रांती घेत आहे त्यातच नव तरुणीची ओढ जास्तच दिसून येत आहे सेल्फी काढणे विविध स्टंड करत असताना बऱ्याच वेळेस कितेक जनाला आपला जिव गमवावा लागला त्यामुळे विशिष्ट ठिकाणी काही अंतरावरून जबाबदारी बाळगत पाहिल्यास उत्तमच राहील