संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा : राळेगांव तालुका काँग्रेसचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना दिले निवेदन

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ,राजा राम मोहनराय, संत साईबाबा या महापुरुषांच्या व संतांच्या बाबतीत वादग्रस्त आणि जातीयवाद विधानामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भिडे करीत असून त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात वातावरण तापले असून संभाजी भिडे यांना तात्काळ पोलीस कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे व त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी राळेगाव तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज दिं १ ऑगष्ट २०२३ रोज मंगळवार ला तहसीलदार अमित भोईटे तथा पोलिस निरीक्षक जाधव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम , उपनगराध्यक्ष जानरावजी गिरी ,
शहर अध्यक्ष प्रदीप ठुने, भानुदास राऊत, श्रीधर थूटूरकर, दिलीप दुधगिरकर, मंगेश राऊत, अफसर अली, प्रदीप लोहकरे ,मंगेश पिंपरे ,प्रतीक बोबडे, अनिल जवादे, अनिल डंभारे, राजू पुडके, बादशहा काजी, नाना आव्हाड, दिलिप लांभाडे, आकाश हिकरे, आचल इंगळे, अमर कांबळे, आकाश खडसे, संजू पोटफोडे, भोला धनकासार, गौरव पायघन, सतीश बोरवार, रवी कांबळे, कुणाल आमटे, शंकर खंडाळकर, रोशन पायघन,आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.