
चंद्रपूर वन विभागात सावली पासून वरोरा पर्यंत अनेक बाबतीत विवादित राहिलेले वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना अखेर मुख्य वन संरक्षक यांनी शनिवारला निलंबित केले.
वनरक्षक यांना चाकूने मारण्याची धमकी दिल्यानंतर वनरक्षक व वनपाल संघटनांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु वनसंरक्षण यांनी या प्रकरणी पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नव्हते. परंतु संघटनाचा रोष लक्षात घेता अखेर सीसीएफ लोणकर यांनी आर एफ ओ राठोड यांना निलंबित केले. वरोरा वनपरिक्षेत्र चे वनरक्षक संदीप वाटेकर यांना शिवीगाळ करून चाकूने मारण्याची धमकी आर एफ ओ राठोड यांनी दिली होती. याची तक्रार मुख्य वनसंरक्षक व पोलीस स्टेशन यांना देण्यात आली होती. त्यानंतर या घटनेची शहानिशा वन संरक्षक यांच्याद्वारे केली . त्याच्यात आर एफ ओ राठोड दोषी आढळून आले होते.परंतु दोषी आढळून आल्यानंतरही मुख्य वनसंरक्षक यांनी कारवाई न केल्याचा आरोप संघटने द्वारा केल्या जात होता. आर एफ ओ राठोड यांच्या विरुद्ध संघटने द्वारा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याचवेळी राज्याचे वन सचिव चंद्रपुरात आल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटून व निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतरही सीसीएफ लोणकर द्वारा कारवाई मध्ये उशीर केल्या जात होता. त्यामुळे शेवटी संघटनेने आर एफ ओ राठोड यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन सीसीएफ कार्यालय समोर धरणे आंदोलन व उपोषण करण्याची तयारी होती. शनिवारला उपोषणाच्या पहिल्याच दिवशी वनसंरक्षक यांनी राठोड यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
