
छोट्यांचे गोड स्वर करणार मनात घर ही टॅगलाईन घेऊन दि. ९ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या झी मराठी लिटल चँप कार्यक्रमात यवतमाळच्या गीत प्रशांत बागडे या शाळकरी गायिकेची निवड झाली असून तिच्या गायनाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गायक कलावंताना शोधून रसिकांसमोर सादर करणाऱ्या झी मराठी वाहिनीच्या ‘ सारेगमप लिटिल चॅम्प ‘ या कार्यक्रमात पं. सुरेश वाडकर, डॉ. सलिल कुलकर्णी, वैशाली माडे-भैसने या गायक संगीतकारांनी गीतची निवड केली. उल्लेखनीय म्हणजे निवड झालेली विदर्भातून गीत बागडे ही एकमेव स्पर्धक आहे. जवाहरलाल दर्डा इंग्लिश मिडियम हायस्कूलमध्ये ती आठवीत शिकते आहे. तिचे आई आणि वडील दोघेही संगीत विशारद आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम या सर्व गायन प्रकारात गीत हिचा रियाज असून तिने आजवर विविध मैफिलीत गायनही केले आहे. संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून, दर्डा इंग्लिश मिडियम शाळेच्या मुख्याध्यापक मिनी जाॅन , सर्व शिक्षक आणि यवतमाळ परिसरातील जाणकारांकडूनही अभिनंदन होत आहे.
