
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
आज दिनांक 7/ऑगस्त रोजी भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत यांनी बंदी भागामध्ये भेट घेतली या प्रसंगी त्यांना बोरगाव ते भवानी या रोडवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसले येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना या भागातील लोकांना याचा प्रचंड त्रास होत होता या वेळी त्यांनी लगेच कुठल्याही प्रकारचा विलंब न करता स्वतः सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते घेऊन बोरगाव भवानी येथील भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ श्रमदानातून सगळे खड्डे बुजविले. आज भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड संपूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हेतर उमरखेड महागाव तालुक्यामध्ये कुठल्याही प्रसंगी गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर कार्य करत आहे भाविक भाऊ भगत यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण हेल्प फाउंडेशन ची टीम निस्वार्थपणे जनसेवा रुग्णसेवा करत आहे आज बंदी भागातील तसेच इतर गावातील लोकांना या फाउंडेशनच्या खूप मोठा आधार मिळत आहे यावेळी भाविक भाऊ यांनी सांगितले की अशाच प्रकारे गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी कुठल्याही प्रकारच्या समस्या असो त्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हेल्प फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते नेहमी तत्पर राहतील या वेळेस संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू भाऊ चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भाऊ राठोड तालुका समन्वयक विनोद भाऊ भोयर गौरवभाऊ राठोड बोरगाव शाखा प्रमुख आकाश गव्हाळे उपशाखा प्रमुख लखन गव्हाळे शाखा सचिव विकास काळबांडे ब्रम्हानंद चव्हाण उपस्थित होते.
