संस्कार सौरभ वाचनालय ढाणकी येथे माझी माती माझा देश उपक्रम

ढाणकी प्रतिनिधी ,
प्रवीण जोशी


ढाणकी येथे संस्कार सौरभ वाचनालय माझी माती माझा देश व ग्रंथप्रदर्शनी कार्यक्रम संपन्न झाला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता दि. ३०/८/२०२३ ला होत आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या उपक्रम संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मेरी माती मेरा देश या नवीन एका उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत पंचप्राण शपथ, वसुंधरा पूजन, वीरो को नमन, ध्वजारोहण व राष्ट्रगान असे कार्यक्रम देशभर राबविण्याचे ठरविले आहे. आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी शासनाच्या परिपत्रकानुसार संस्कार सौरभ सार्वजनिक वाचनालय ढाणकी येथे ९/८/२०२३ ला पंचप्राण शपथ, व ग्रंथालय कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत रावते साहेब, सचिव नामदेव गोपेवाड सर, ग्रंथालय शैलेश कुंभारे, युवक वाचक व बालकांचा समावेश होता