
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका काँग्रेस कार्यकारिणी पदाधिकारी व राळेगाव शहर काँग्रेस कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती आज दिनांक २०/८/२०२३ रोज रविवारी सकाळी ११ वाजता साजरी करण्यात आली.त्यावेळी सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.त्यावेळी काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,काॅंग्रेस शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे,युवक काॅंग्रेसचे राळेगाव तालुका अध्यक्ष धवल घुंगरूड, नगरपंचायत राळेगावचे नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी,माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद तामगाडगे,ग्राम विविध कार्यकारी सेवा संस्था राळेगावचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे,नगरपंचायतीचे बांधकाम सभापती मंगेश राऊत, दिलीप दुधगीकर,माजी उपसरपंच गजानन पुरोहित, जेष्ठ कार्यकर्ते भानुदास राऊत, पुरूषोत्तम कोपरकर,माजी नगरसेवक अफसर अली सैय्यद, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर, खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काचोळे, संचालक पवन छोरीया,माजी संचालक प्रविण झोटींग, गजानन पाल,राजू दुधपोळे,प्रेम ताकसांडे, निलेश हिवरकर,बंडू लोहकरे, मंगेश पिंपरे, अंकित कटारिया,राजू नागतूरे, बादशाह काझी, सुनील भामकर,कुणाल इंगोले,बबलू सैय्यद,अशोक पिंपरे, विनोद माहुरे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतर नगरपंचायत कार्यालयातील प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष रविंद्र शेराम यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी सुध्दा वरील सर्व मान्यवर उपस्थित होते.
