
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जि.प. उ. प्रा. शाळा, सायखेडा (बु), केंद्र येळाबारा, पं.स. यवतमाळ येथे आदरणीय श्री. योगेश डाफ, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. यवतमाळ यांनी आकस्मिक भेट देऊन शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहित केले.
भेटीच्या प्रारंभी केंद्रप्रमुख श्री. शाम माळवे सर यांच्या वतीने श्री. डाफ साहेब व त्यांची सहचारिणी सौ. जागृती योगेशजी डाफ मॅडम (वानखडे), सहाय्यक शिक्षिका, सायखेडा (बु), यांचा शाल, श्रीफळ व दिवाळी सस्नेह भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर श्री. डाफ साहेबांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मृतिप्रित्यर्थ ५३ विद्यार्थ्यांना स्वीट भेट देऊन त्यांना आनंद दिला. विद्यार्थ्यांना “आम्हीही जिल्हा परिषद शाळेतूनच मोठे झालो; तुम्हीही मन लावून अभ्यास करा आणि मोठे व्हा” असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान केंद्रप्रमुख श्री. माळवे सर, मुख्याध्यापिका सौ. सविता उईके मॅडम, श्री. अर्के मॅडम, श्री. मांडवे सर यांना शाल, श्रीफळ व दिवाळी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. शालेय पोषण आहार कर्मचारी कोडापे आजी आणि स्वयंपाकी आजींनाही प्रेमपूर्वक गौरवण्यात आले.
वाकी दुधाणा शाळेचे आ. श्री. सचिन करनेवार सर यांच्या उत्कृष्ट अध्यापन कार्याबद्दल त्यांनाही श्री. डाफ साहेबांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्वीट देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी बनविलेल्या ग्रीटिंग कार्ड्स देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली — “कृतज्ञ आम्ही! कृतार्थ आम्ही!!” अशा भावनांनी वातावरण भारावून गेले.
यानंतर सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.
आकाशदिवा स्पर्धेत विजेते ठरले —
प्रथम क्रमांक: प्रिन्स महेंद्र दुल्लरवार
द्वितीय क्रमांक: ईश्वरी रविंद्र अवघान
तृतीय क्रमांक: सोनाक्षी राजू कोयरे
(सर्व विजेत्यांना गॅदरिंगच्या वेळी भेटवस्तू दिल्या जाणार असल्याचे सौ. उईके मॅडम यांनी सांगितले.)
भेटीदरम्यान श्री. डाफ साहेबांनी शाळेतील VALA योजनेअंतर्गत पहिल्या वर्गासाठी ४,००० रुपये किमतीचे गणित व भाषा साहित्य पाहून समाधान व्यक्त केले आणि “पीएमश्री योजनेसाठी विद्यार्थी पट वाढविण्याचे प्रयत्न करा” असे मार्गदर्शन केले.
शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत श्री. निरंजन मांडवे सर यांनी सर्वांचे आभार मानले. शेवटी शाळेच्यावतीने सर्व मान्यवरांना व पालकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
परसबागेत पालक, मेथी, टोमॅटो, मिरची, वांगी यांची जोपासना पाहून श्री. डाफ साहेब आणि केंद्रप्रमुख श्री. माळवे सर यांनी शिक्षकांच्या परिश्रमाचे कौतुक केले.
या सर्व उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. देवकी अर्के मॅडम, श्री. निरंजन मांडवे सर व सौ. जागृती वानखडे मॅडम (डाफ) यांचे मोलाचे योगदान राहिले.
कार्यक्रमाचा समारोप आनंदी, स्नेहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात झाला
