संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे शिक्षक दिन साजरा,विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत


राळेगाव : येथील संस्कृती संवर्धन विद्यालय येथे दिनांक 5 सप्टेंबर ला भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन व वक्तृत्व स्पर्धा उपक्रम घेण्यात आले.
विद्यार्थ्यांनी स्वयंशासनात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.दिवसभर चालणाऱ्या स्वयंशासनात मुख्याध्यापिका म्हणून समीक्षा तेलंग तर शिक्षक -शिक्षिका म्हणून रोशनी बावणे, प्रणाली पुरके, प्राजक्ता वागदे, आयुष वासेकर, जान्हवी काटकर, स्नेहगंधा डोये, मंगला ठाकरे, सेवक -ध्रुव सातपुते या विद्यार्थ्यांनी आपापली भूमिका पार पाडली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती प्रतिमापूजन व माल्यार्पण करून सुरु करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी येसेकर होत्या, त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला तर श्री. दिनकर उघडे सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेत रोशनी कार्लेकर, आयुष वासेकर, स्नेहा सोनटक्के, मानसी आडे यांनी आपली मनोगते व्यक्त करून अनुक्रमे क्रमांक मिळविले. कार्यक्रमाचे आयोजन स्वतः विद्यार्थ्यांनी केले, यात संचालन समीक्षा तेलंग तर आभार जान्हवी काटकर या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सीमा देशमुख, देवेंद्र मून, राकेश नक्षिणे, ज्ञानेश्वरी आत्राम, सलमा कुरेशी, भाग्यश्री काळे, विलास ठाकरे, अनंता परचाके, प्रकाश अंबादे या शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.