
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) ता.राळेगाव जि.यवतमाळ हे गाव वाढोणा – वडकी या मुख्य रस्त्यावर वाढोणा ( बा ) येथून ४ की.मी अंतरावर असून गावा मध्ये बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.इयत्ता ५ वी पासून पुढील शिक्षण घेण्या करीता विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावे लागते, वेळे नुसार खाजगी वाहन उपलब्ध नसते तसेच खाजगी वाहनांचे दर परवडणारे नसल्याने विद्यार्थी वेळेवर शाळेत उपस्थित राहू शकत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तरी करंजी ( सो ) या गावा करीता शाळेच्या वेळे नुसार सकाळी ९.३० मी. व सायं ५.३० मी. या वेळे वर बस सेवा उपलब्ध करून द्यावी जेणे करून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत उपस्थित राहता येईल करीता करंजी ( सो ) येथील समस्त विद्यार्थ्यांसह सरपंच प्रसाद ठाकरे यांनी आगर प्रमुख राळेगाव यांना निवेदन दिले, या वेळी समाजसेवक बाळू भाऊ धुमाळ,सरपंच प्रसाद ठाकरे,इम्रान पठाण, ग्रा.पं.सदस्य मनोज खंडाळकर,पराग मानकर, आदित्य कडु,अंकुश कचवे,अविनाश मेश्राम व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.
