दोन गटात हाणामारी,2 गंभीर जखमी घटनस्थळावरून एक मोपेड व दोन लोखंडी रॉड जप्त

वरोरा शहरातील जिजामाता वॉर्ड ,बावणे ले आऊट जवळ असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात काल रात्री उशिरा दोन गटात घडलेल्या हाणामारीत अमोल बोरकुटे रा. जिजामाता वॉर्ड,वरोरा(25)व प्रशांत झाडे रा. एकार्जुना (25)हा गंभीर जखमी झाले.ही घटना रात्री 12.30 च्या सुमारास दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी घडली.
जिजामाता वॉर्ड येथील रहिवासी अमोल बोरकुटे हा मंदिराच्या जवळच राहतो .घटना घडल्यानंतर अमोल जखमी अवस्थेत स्वतः चालत जात घरी पोहचला .घटनेचे गांभीर्य ओळखून आई ,वडील व भावाने अमोल ला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले.तर अमोल बोरकुटे व प्रशांत झाडे याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास त्वरित चंद्रपूर येथे हलविण्यात आले. प्रशांत झाडे हा घरचा सदन असून अमोल रोज मजुरीचे काम करायचा.काही वर्षाआधी प्रशांत झाडे याने एका मुलीशी प्रेमविवाह केला होता.मात्र त्या मुलीचा मृत्यदेह रेल्वे लाईन वर आढळल्याने त्या घटनेचा संबंध तर या घटनेशी असावा असा अंदाज नागरिकांद्वारे व्यक्त केला जात आहे.झाडे याचे काही दिवसांपूर्वी प्रफुल नावाच्या व्यक्ती सोबत भांडण झाले होते.त्या भांडणाचा वचपा म्हणून तर ही घटना घडली असावी असाही तर्क लावल्या जात आहे. पोलिसांना घटनस्थळावरून एक विना नंबर प्लेट असलेली निळ्या रंगांची दुचाकी , दोन लोखंडी रॉड ,मंदिर परिसराबाहेर गवतावर सांडलेले रक्ताचे नमुने पोलिसांनी जप्त केले असून अज्ञात आरोपींच्या विरोधात जखमींद्वारे बयानाअंती गुन्हे दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.