
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्ह्यातील नैसर्गिक सेंद्रिय म्हणून पावसाळ्यात शेतात उगवणाऱ्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या पालेभाज्या, रानभाज्या नामशेष होऊ लागल्या आहेत. शेतीवरील मजुरी खर्च कमी करण्याकरिता मजुरांची वाढती टंचाई लक्षात घेत शेतकरी शेतात तणनाशक मारत आहेत. परिणामी, नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यामुळे यावर्षी रानभाज्यांची चव दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे. कापूस पिकावरील पर्याय नसल्याने तसेच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तणनाशके पासून होणारे नुकसानबाबत जनजागृती व प्रबोधनाच्या अभावामुळे अपयश आल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकामधील तन संपुष्टात आणण्याकरिता तसेच धुऱ्या पाळीवर तणनाशकाचा उपयोग करीत असल्याने रानभाज्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रानभाज्या आरोग्यासाठी देखील तितक्याच चांगल्या आहेत. पावसाळ्यात ग्रामीण भागात शेतात उगविणाऱ्या सुरुवातीला आंबाडी, काटवल, कडूची भाजी, उंदीर कान, तरोटाआदी रानभाज्या पावसाळ्यात आनंदाने जेवणात असायच्या पण बांधीच्या धुऱ्यावरतणनाशक मारल्यामुळे रानभाज्या परवडणासे झाल्यामुळे शेतकरी अलीकडच्या काळात दुर्मिळ होऊ नाइलाजाने तणनाशकाकडे वळु लागल्या आहेत. आहे. शासनाने शेती कामासाठी शेतीला रोजगार हमीची जोड घातल्यास जोड आवश्यक शेतीमध्ये तण शेतकऱ्यांना मजूर मिळेल व नियंत्रणासाठी मजुरांची आवश्यकता तणनाशकाचा वापर कमी होईल. असते. मात्र, मजुरांची टंचाई आणि मजूरटंचाईचा प्रश्नसुद्धा मार्गी लागू, शकते वाढलेले दर शेतकऱ्यांना माघाईस शकतो त्यामुळे शेतीला रोजगार आवश्यक आहेत. शेतीचा खर्च हमी जोड आवश्यक आहे.
