
वणी : तालुक्यांतील वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोडगाव शेतशिवारातील मुरुमासाठी खोदून असलेल्या आणि त्यात 10 ते 15 फूट पाणी साचून असलेल्या खड्ड्यात दुपारी 12 वाजताच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला होता. तेव्हां आढळलेल्या मृतदेहाची माहिती गोडगाव येथील पोलिस पाटीलांनी वणी पोलीसांना दिली होती त्यावेळीं पोलिसांनी घटना स्थळीदाखल होवून चौकशी केली असता तो पाण्याच्या खड्ड्यात सापडलेला मृतदेह मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या इजासन येथील वेडसर (मतिमंद) असलेल्या विशाल पोतू आत्राम (20) याचा आहे असे चौकशी अंती माहीत झाले. तो मृतदेह आढळल्याची माहिती गोडगाव येथील पोलिस पाटीलांनी वणी पोलीसांना दिली त्यांनंतर पीआय अजित जाधव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या चमूने प्रत्यक्ष स्थळाला भेट देवून चौकशी केली त्यावेळीं विशालच्या वडिलांनी विशालच्या अंगावर असेलल्या कपड्यावरुन व चेहऱ्यावरून बघितले असता विशालच असल्याचे निष्पन्न झाले विशाल लहानपासूनच मतिमंद व वेडसर होता.
तो कुठेही जंगलात स्मशानभूमीत शेतात नेहमी फिरायचा आणि पुन्हा सायंकाळ झाल्यानंतर परत घरी यायचा पण तो गेल्या तीन चार दिवसापासून घरून गेला असता आईवडील भाऊबहिण यांनी ठिकठिकाणी शोध घेतला असता तो सापडला नव्हता तरी आज 9 सप्टेंबर रोजीही विशालचे वडील त्याला शोधण्यासाठी फिरतच होतें पण त्याचा पाण्याच्या खड्ड्यात मृतदेह आढळुन आला विशाल हा नेहमीच जंगलात फिरत असताना कोणत्याही खड्ड्यात साचून असलेले पाणी प्यायचा आणि वेडसर असल्याने दिवसभर जंगलातच रहायचा त्यामुळे तो खड्ड्यात पाणी पिण्यासाठी उतरला आणि तोल जावून पाण्यात पडून मृत्यु झाला असा निष्कर्ष निघत आहे तरी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तरी समोरिल तपास पीआय अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.
