उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील दोन्ही तालुक्याच्या नागरिकांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा-आ. नामदेव ससाने यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रात सन १९०० च्या दरम्यानच्या मराठा समाजाला महसुली पुरावा उदा. हक्कनोंदणी मध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे. तर त्याच परिवारातील लोकांचा सन १९६० ते ८० च्या दरम्यान कुणबी जातीचा उल्लेख आहे. तर परत सन १९८०च्या पुढे ब-याच महसुली व शालेय कागदपत्रांवर कुणबी जातीचा उल्लेख आहे.
ज्याच्या जवळ कुणबी जातीचा व मराठा जातीचे दाखले आहेत अशा सर्व परिवारामध्ये विवाह संस्कार हे पूर्वापार, पिडीजात चालत आलेले आहेत.
माझ्या मतदार संघातील उमरखेड व महागाव हे दोन्ही तालुके १९६० पूर्वी मराठवाडयात होते व आता दोन्ही तालुके हे विदर्भामध्ये मराठवाडयाच्या सिमेवर आहेत. जर श्री. मनोज जरांगेच्या मागणीप्रमाणे मराठवाडयातीलच मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले तर उमरखेड महागाव व पुसद तालुक्यावर अन्याय होईल व हा अन्याय होऊन नये याकरिता माझ्या मतदार संघातील मराठा समाजाचे युवक उमरखेड तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले आहे. आपणांस विनंती आहे की, ज्याप्रमाणे आपण मराठवाडयातील मराठा समाजास कुणबी समाजाचे आरक्षण लागू करण्याच्या विचारात आहात त्यामध्ये मराठवाडयाच्या सिमेवर असणा-या माझ्या मतदार संघातील उमरखेड व महागाव तालुक्याचा समावेश करुन मराठा-कुणबी समाजास न्याय द्यावा जेणेकरुन यासंदर्भात उमरखेड येथे चालू असलेले मराठा समाजाचे युवकांचे आंदोलन थांबवावे व याबद्दल संबंधितांना आपल्या स्तरावरुन तात्काळ आदेशित करावे, अशी विनंती आमदार नामदेव ससाने यांनी मुख्यमंत्री महोदयाना केली आहे .