

प्रकरणातील ट्विस्ट आणखीनच वाढला .
प्रतिनीधी,बिटरगांव (बु.)
बिटरगांव सह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेली बहुचर्चीत ग्रामपंचायत बिटरगांव (बु) मागील अनेक वर्षापासुन सत्तापक्ष व विरोधी पक्ष यांच्या संघर्षा मध्ये प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष व वरिष्ठ पदाधिकारी तसेच दोन माजी आमदारा सह चालू आमदार यांनी प्रतिष्ठेची पराकाष्ठा केलेली होती. दि. 21 ऑगस्ट रोजी सरपंच पदाची निवडणूक झाली परंतु अगदी वेळेवर उच्च न्यायालयाचे आदेश आल्याने सरपंच पदासाठी मतदान तर झाले परंतु निकाल राखून ठेवण्यात आला कारण ग्रामपंचायत चे दोन सदस्य ऍड विनोद नंदकुमार मामीडवार व बालवंदना अनिल गायकवाड यांची अप्पर आयुक्त अमरावती यांचेकडे अपात्रतेची जि न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे त्याचा निर्णय लागल्या नंतरच निकाल जाहीर करावा व संबधीत प्रकरणाचा निकाल मा. अप्पर आयुक्त अमरावती यांनी दोन आठवड्यामध्ये द्यावा असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिले होते. त्यामुळे मतदान तर झाले. परंतु निकाल लागला नव्हता त्यामुळे 29 ऑगस्ट 2023 रोजी सरपंच पदाच्या निवडीमध्ये एकून 12 मतदान झाले अशातच दोन आठवड्याचा आवधी असल्याने अप्पर आयुक्त यांनी दि. 05/09/2023 रोजी न्यायलयीन निकाल देत ऍड विनोद नंदकुमार मामीडवार व बालवंदना अनिल गायकवाड यांना आदेश काढून अपात्र घोषीत केले
त्यामुळे सरपंच पदाच्या निवडीमध्ये जरी 12 मतदान झाले होते तरी दोन सदस्य अपात्र झाल्याने आता केवळ 10 मतांची मोजनी होणार गोपनीय पध्दतीने झालेले मतदान आता कसे मोजणार कि दुबार मतदान होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आशातच उमरखेड तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मा. जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शन मागीतलेले आहे. त्यामुळे प्रकरणात ट्विस्ट आनखीनच वाढला आहे. 13 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण महिला या राखीव पदासाठी सरपंच पद आहे. सुरवातीला 2021 साली झालेल्या सार्वत्रीक ग्रामपंचायत निवडणुक अतिषय चूरशिची झाली होती. त्यामध्ये प्रकाश पेंधे यांच्या गटाला 7 तर विरोधी गटाला 6 असे सदस्य निवडून आल्याने प्रकाश पेंधे गटाच्या सौ. गोकर्णाबाई शंकर देवकते ह्या सरपंच पदी विराजमान झाल्या होत्या तर प्रकाश पेंधे उपसरंपच पदी विराजमान झाले होते परंतु 2 मार्च रोजी सरपंच सौ गौकर्णाबाई शंकर देवकते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले व बिटरगाव (बु ) येथील सरपंच पद रिक्त झाले. आशातच सत्ता गटाकडे असलेल्या अनुसुचीत जमातीच्या सदस्या रेणुकाबाई रामा अंकुरवाड यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अपर जिल्हाधिकारी, यांनी त्यांना अपात्र घोषत केले. त्यामुळे सत्ताधारी गटाकडे पाच तर विरोधी गटाकडे सहा असे सख्यांबाळ झाले अशातच सत्ताधारी गटाने सातत्याने गैरहजर असलेल्या विरोधी गटाकडे असलेल्या दोन सदस्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या कडे अपात्र करण्यासंदर्भात प्रकरण दाखल केले मु. का. अ. यवतमाळ यांनी प्रकरण गुणवत्तेवर आधारीत
निकाली काढले त्यामुळे परत सत्ताधारी गटाकडे पाच व विरोधी गटाकडे चार असे संख्याबळ झाले म्हणून मु. का. अ. तथा प्रशासक जि.प. यवतमाळ यांचे निकालावर व्यथित होऊन विरोधी पक्ष मा. अप्पर आयुक्त अमरावती यांचकडे अपिल दाखल केली व स्थगनादेश मिळविला आप्पर आयुक्त अमरावती यांनी दि 23 ऑगस्ट पर्यंत स्थगनादेश देऊन सदस्य पद कायम ठेवले या स्थगनादेशाचा चुकिचा फायदा घेत व राजकीय पाठबळ वापरून तालुक्यातील नेत्यांनी प्रशासनीक दबाव वाढवून दि २१ ऑगस्टलच सरपंच पदाची निवडणुक लावली कारण संख्याबाळाचा खेळ पाहता सत्ताधारी पक्षाकडे पाच तर विरोधात सहा सदस्य होते त्यामुळे आपल्याच गटाचा सरपंच निश्चित होणार असा समज करुण प्रोग्राम आखला परंतु सत्ता गटाच्या लोकानी अप्पर आयुक्त अमरावती यांचे स्थगनादेश विरुद्ध मा. उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर येथे धाव घेतली व ऐन सरपंच पदाच्या निवडीच्या काही मिनीट अगोदर सरपंच पदाचा निकाल लावू नये व अप्पर आयुक्त अमरावती यांचे समोर सुरु असलेल्या दोन सदस्यांच्या अपात्रतेचा निकाला नंतरच सरपंचाच्या निवडीचा निकाल द्यावा असे स्पष्ट आदेश देत दोन आठवडयात अप्पर आयुक्त अमरावती यांनी आदेश देण्याविषयी सुद्धा स्पष्ट आदेश दिले त्यामुळे दि 5/09/2023 रोजी अप्पर आयुक्त यांनी विरोधी गटाच्या दोन सदस्यांना अपात्र केले. त्यामुळे विरोधी गटाचे सरपंच पदाचे स्वप्न पुन्हा एकदा धूळीस मिळाले. व पुन्हा एकदा कोंडबाजी इंगोले, भास्कर देवकते व प्रकाश पेंधे यांचे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले.
