ढाणकी शहरात सर्जा राजाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


ढाणकी शहरात भारतीय संस्कृती ॠतुनुसार वेगवेगळ्या सणांचे महत्व असून यामध्ये नागपंचमी,राखी पौर्णिमा, गणेश चतुर्थी यासोबतच शेतकरी वर्गात आनंदाचा क्षण म्हणजे सर्ज्याराजाचा बैलपोळा आहे.शेतकऱ्यांचा मित्र म्हणून बैलाला शेतकरी राजा
त्यांचे पालनपोषण करित अगदी आपल्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेतात.दि.१४ सप्टेंबर २०२३ रोज गुरुवार श्रावण कृ ३० अमावस्येला महाराष्ट्रात बैलपोळा म्हणून साजरा करण्यात आला.बैलांची छान सजावट करुन रंगीबेरंगी झुली अंगावर टाकून शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. आज त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य हा महत्त्वाचा असतो.परंपरेनुसार आज मानकरी पाटलांच्या बैल जोडीचे हनुमान मंदीराच्या समोर विवाह लावण्यात आला .मानकरी बैल जोडीचे पाच प्रदक्षणा घालुन त्यानंतरच शहरातील बैल हनुमान मंदीराला प्रदक्षणा घातल्यानंतर शहरातून मिरवून आणल्यानंतर बैलांचे घरातील माता भंगिनी औक्षवंण करुन पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला धूर म्हणले की धूरनारा असा एकमेव सारथी म्हणजे सर्जा राजा होय. म्हणून शेतकरी हा सर्वात मोठा सण बैलपोळा मानतो
यावेळी ढाणकी शहरात व आजूबाजूच्या खेड्यात कुटूंबीयासह बैलपोळा सणाला
नागरिक व माता भंगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतत संकटाची मालिका कायम असताना बैलाला सजविण्यासाठी जो साज लागतो त्यात कुठलीही कमतरता शेतकरी बांधवांनी ठेवलेली दिसली नाही ही विशेष बाब म्हणावी लागेल ढाणकी शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरामध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले तसेच स्वस्तिकाची फुले व त्यात बेल गुंफून बैलांच्या शिंगाला मुंडावळी बांधण्यात आली होती बाहेरगावी कार्यरत असलेला नोकरवर्ग आवर्जून या वेळेस आपल्या शहराकडे पोळा उत्सव साजरा करण्यासाठी आला होता व अनेक चीमुकल्यांनची यावेळी लगबग बघायला मिळाली घराच्या छतावर चढून यावेळी हा उत्सव पाहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही सगळीकडे लंपी आजाराचे सावट असताना शेतकऱ्यांनी सुद्धा सुरक्षित अंतर ठेवून आणि या रोगाचे गांभीर्य ओळखून हा सणउत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी जागरूक आणि सजगपने राहून कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नाही याची दक्षता घेतली
.