
यवतमाळ प्रतिनिधी::प्रवीण जोशी
श्रावण महिना म्हणजे सणासुदीची रेलचेल असते भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण भारत देशात सगळीकडे श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल या दिवशी अर्थातच ब्रम्ह मुहूर्ता पासून प्रातःकाळी ४::४८ते दुपारी १::५४ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सवडीनुसार घरातील स्थापित गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल अशी माहिती विनायक बनसोडे गुरुजी यांनी दिली गणरायाच्या स्थापनेसाठी भद्रादीविष्टी कोणतेही सुयोग वर्ज करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना माध्यानंतर देखील करता येऊ शकते. १९ सप्टेंबर २०२३ ला गणेश चतुर्थी असून या दिवशी चंद्र तूळ राशीत तर सूर्य कन्या राशीत राहणार आहे व या दिवशी मृण्मयी गणेश मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी तसेच श्रीं च्या पूजनात लालफुले, दुर्वांकुर २१आणि २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा तसेच २१ सप्टेंबर २०२३ रोजी गुरुवार असून अनुराधा नक्षत्र दुपारी ३ वाजून ३४ मिनिटापर्यंत असल्यामुळे आपल्या परंपरेनुसार जेष्ठा गौरी महालक्ष्मीचे आव्हान करून स्थापना शुक्रवारी म्हणजेच शुद्धसप्तमीला ज्येष्ठा गौरीचे पूजन करून महानैवेद्य दाखवावा. शुद्धअष्टमी शनिवारी मूळ नक्षत्रावर म्हणजे दुपारी २ वाजून ५५ मिनिटापर्यंत जेष्ठा गौरीचे विसर्जन करावे अशी आवाहन विनायक बनसोडे गुरुजी यांनी केले
