
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आठमुर्डी येथील शेतकरी श्रीधर वारलू कोयचाडे हे आपली बैल जोडी घेऊन त्यांच्या मित्राच्या शेतात शेती काम करण्यासाठी गेले असता आज अचानक तालुक्यात पावसाची सुरवात झाली या पावसात शेतकरी यांनी आपले बैल शेता बाहेर काढत असताना त्यांच्या एका बैलावर आज दिनांक 21 रोजी दुपारी अंदाजे तिन वाजता विज पडून एक बैल जागीच ठार झाला या घटनेची माहिती गावातील नागरिक सुनील शिवनकर यांनी गावात दिली तसेच गावकरी घटनास्थळी दाखल होऊन शेतकरी व एका बैलाला घरी घेऊन आले. शेती हगांमाच्या दिवसावर शेतकरी यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने आर्थिक मदत करुन द्यावी अशी मागणी गावकरी करित आहे.
