राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे विज पडून उभे पिक जळाले

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे गुरवाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पावसाची सुरवात झाली यात पिंपळगाव येथील महिला शेतकरी नानीबाई अजाबराव महाजन यांच्या शेतात विज पडून पराटी वानाचे पिक जळाले विशेष म्हणजे नानीबाई यांचा मुलगा आज शेतात आपले गुरे घेऊन गेला असता त्याने शेतात पाहनी केली पाहनी करत असतात त्याला पराटी हे पिक जळाले दिसले हि माहिती गावात फसरताच गावातील काही शेतकऱ्यांनी पाहनी केली असता विजेमुळे हे पिक जळाले असे निष्पन्न झाले. राळेगाव तहसीलदार यांनी पंचनामा करून महिला शेतकरी यांना शासनातर्फे मदत मिळवून देण्यात यावी.