
उमरखेड:प्रवीण जोशी
आगामी नगर पालीका जि प व पं स निवडणुकीसाठी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत सैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे राहा असे आवाहन शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे .
दि. 2 मार्च रोजी स्थानिक राजस्थान भवन येथे ठाकरे गटाच्या पार पडलेल्या शिवगर्जना मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना नेते शरद कोळी , युवा सेना सचिव दुर्गा भोसले शिंदे , युवा सेना नेते हर्षद काकडे, यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे , संपर्क प्रमुख राजेन्द्र गायकवाड , नेते प्राचार्य मोहनराव मोरे , नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश मारावार ,जिल्हा संघटक राजेश खामनेकर , उपजिल्हाप्रमुख अॅड बळीराम मुटकुळे , जिल्हा महिला संघटिका निर्मला विनकरे , विशाल पांडे व उमरखेड महागाव विधासभा संघटक प्रशांत जोशी आदिंची उपस्थिती होती .
यावेळी मार्गदर्शन करतांना खासदार खैरे पूढे म्हणाले की , ज्या पक्षाने पद देऊन मोठे केले त्यांनी पक्षासोबत बेइमानी करून उद्धव ठाकरे सारख्या कणखर नेतृत्वाला भाजपाच्या इडी भितीने सत्तेपासुन खाली खेचले त्या पळपूटाना बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक भिक घालणार नाही . हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील , यांना आपण वेळोवेळी सहकार्य केले पण त्यांनी खोक्या पायी बेइमानी केली . जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड मागील काही बाबींचा उल्लेख करून त्यांचा व खासदार भावना गवळी यांचा खरपूस समाचार खैरे यांनी घेतला न्यायालयात उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम असल्याने न्याय देवता योग्य न्याय करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . त्यामुळे भाजपाच्या कटकारस्थानाला न भिक घालता आगामी नगरपालीका व जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी शिवसैनिकांनी दक्षा राहावे असे आवाहन केले . यावेळी उमरखेड – महागाव विधानसभेचे नेते प्राचार्य मोहनराव मोरे यांनी भाजपाने देशात अराजकता माजविली असून विरोधी पक्ष नेस्तनाबुत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे . शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल भावाने घेतल्या जात आहे . केन्द्र व राज्य सरकार उद्योगपतींना धार्जिने झाले आहे . त्यामुळे महागाईच्या विळख्यात सर्व सामान्य जनता होरपळली जात आहे . युवा नेते शरद कोळी यांनी आपल्या खास बोलीभाषेत पक्षासोबत केलेल्या.बईमनांचा समाचार घेतला . तर नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश मादावार यांनी नांदेड व वाशीम – यवतमाळ मधील तिघांचा गबरु झीप्री व डाकु असा उल्लेख करीत पक्षाचे उपकार विसरणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन केले, प्रविण शिंदे , यांची आक्रमक भाषणे झाली . हा शिवगर्जना मेळावा यशस्वी करण्यासाठी उमरखेड – महागाव विधान सभा क्षेत्रातील ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने हजर होते . कार्यक्रमाचे संचालन तालुका प्रमुख सतिश नाईक यांनी केले .
