31 जुलै नंतर नुकसान झाल्यासच पिक विमा मिळेल

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव शहरांमध्ये 21 जुलैला मुसळधार पाऊस झाला त्या पावसाने शहरासह मेंगापूर रोडवरील शेताचे अतोनात नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या पण कंपनीने सांगितले की 31 जुलै नंतर नुकसान झाल्यासच नुकसान भरपाई मिळेल 31 जुलै पूर्वी नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही ।।।21 जुलैला राळेगाव शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसामुळे नाल्याला तसेच कॅनलला पूर आला या पुरामुळे नाल्याकाठी असलेले शेत तसेच केनाडी काठी असलेल्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेत खरडून गेलीत शेतामध्ये अनेक दिवस पर्यंत पाणी साचून होतं काही शेत तर पडीत पडलेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार अर्ज केले त्या ते अर्ज पोहोचल्याचे डॉकेट नंबर सुद्धा संबंधित शेतकऱ्यांना आले यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी राळेगाव येथे कंपनीच्या कार्यालयात संबंधित पिक विमा प्रतिनिधीची भेट घेतली असता पिक विमा प्रतिनिधी म्हणाला 21 जुलैला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही नुकसान हे 31 जुलै नंतर व्हावयास हवे तरच नुकसान भरपाई मिळेल प्रतक्षात पीकविमा हा आपण पीक पेरल्यापासून तर काढणीपर्यंत चा काढत असतो यात संपूर्ण जोखीम अंतर्भूत असते ।।। पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै असते यावेळेस शासनाने तीन दिवस तारीख वाढवून दिली होती जेव्हा पिक विमा कंपनी प्रतिनिधी म्हणाला की 21 जुलैला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही नुकसान 31 जुलै नंतर व्हावयास हवे हे ऐकूण संबंधित शेतकरी अवाक झाला कारन अतिवृष्टी ही सांगून होत नसते असे शेतकऱ्यांना करता आले असते तर अतिवृष्टीला 31 जुलै नंतर व्हावयास सांगितले असते असे संबंधीत शेतकऱ्यांनी पिक विमा प्रतिनिधीला उत्तर दिले यावर प्रतिनिधीने अजूनही वेळ गेली नाही आता जर नुकसान झाले तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते असे सांगितले म्हणजे यासाठी पुन्हा संबंधीत शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी ईश्वराला साकडे घालावे लागेल व स्वतःसह सर्व शेतकऱ्यांचे नुकसान करून घ्यावे लागेल म्हणजेच झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई न देता पुन्हा नुकसान भरपाई झाल्यास ती नुकसान भरपाई मिळेल हा कंपनीचा कोणता नियम आहे हे संबंधित शेतकऱ्याच्या समजण्यापलीकडचे आहेत त्या प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाईच मिळणार नाही असे समजते आपल्याकडे सर्वाधिक पाऊस हा जुलै महिन्याचा पडतो आणि या अतिवृष्टीची नुकसान भरपाई जर मिळणार नसेल तर पिक विमा काढून काय फायदा कारण बहुतांश वेळा अतिवृष्टी ही जुलै महिन्यात होते नुकसान झालेले शेत आजही त्याच अवस्थेत आहेत काही शेत पडीत पडले आहेत आजही कंपनीच्या प्रतिनिधीने पंचनामे केल्यास नुकसानीच्या खुणा या स्पष्ट दिसतात पीकविमा कंपनी नियमाच्या नावाखाली नुकसान भरपाई टाळत असेल तर संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहेत।।। शासन दरवर्षी नवीन विमा कंपनी जिल्ह्यासाठी नियुक्त करते आधीच्याच वर्षाचे हिशोब ही संबंधित कंपनी देत नाहीत व वर्ष झाले का आपला गाशा गुंडाळून जिल्ह्यातून परागंदा होते नवीन कंपनी आली की ती मागील वर्षाचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते ते आमच्याकडे काही नाही असे सांगून कंपनी मोकळी होते अशा परिस्थितीमध्ये मागील वर्षाचा हिशोब किंवा मागील वर्षाची नुकसान भरपाई कोणाकडून घ्यायची हा प्रश्न सुद्धाअनेक शेतकऱ्यांना भेडसावत आहे या सगळ्या गोष्टीवरून पिक विमा हा विषय केवळ टाईमपास तर नाही ना याविषयी शेतकऱ्यांच्या मनात शंका येते वरवर दाखवायचे की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप करत आहोत एक रुपयात पिक विमा देत आहोत दुसरीकडे नुकसान होऊनही वेगवेगळे नियम सांगून ते टाळायचे हे प्रयोग दरवर्षीच पिक विमा करते अशा परिस्थितीत शेतकऱ्याला न्याय कुठे मागावे हेही कळत नाही याबाबत स्पष्टताही नसल्याने शेतकऱ्यांचे मात्र यात मरण होत आहेत एवढे निश्चित।।।