

महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
महागाव शहरात धुमाकूळ घालणाऱ्या वानरांना जेरबंद करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून महागाव शहरामध्ये वानरांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हेदोस घातला होता. ही वानेर शेतातील अन्नधान्यांचे व इतर साहित्यांची अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान करत होते. पूर्वी साधारणपणे वानर जंगलात आढळत असत मात्र गेल्या काही वर्षापासून महागाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वानरांच्या कळपाने हेदोस घातला होता. ही वानर महिलांवर हल्ला करत होते त्यामुळे महिलांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते . यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. या गोष्टीची दखल घेत याकडे लक्ष देऊन वानरांना तात्काळ जेर बंद करावे. अशी मागणी समाजसेवक तथा युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष प्रतीक पाटील नरवाडे यांनी (उपवनसंरक्षक अधिकारी डॉ.बी. एन स्वामी ) यांच्याकडे मागणी केली होती अन्नथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समाजसेवक तथा युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष प्रतीक पाटील नरवाडे यांनी केला होता. याच गोष्टीची दखल घेत आज डॉ. बी. एन स्वामी उपवन संरक्षक त्यांनी आज तात्काळ पीपल फॉर ॲनिमल पथक यांना वनरांना जेरबंद करण्यासाठी महागाव येथे पाठवले होते . संबंधित अधिकारी कुणाल लिमकर RFO (रेस्क्यु युनिट पुसद प्रमुख)
मुखबीर शेख RO (डार्ट विशेषज्ञ)
किरण सातपूते (कोब्रा युनिट स्टाफ)
शुभम अत्राम (कोब्रा युनिट स्टाफ)
श्रीकांत डोरले (कोब्रा युनिट स्टाफ)
व तसेच महागाव वन विभाग कर्मचारी याना वाणराना जेरबंद करण्यासाठी महागाव येथे पाठवले होते . संबंधित अधिकारी महागाव वन विभाग अधिकारी मा. श्री. देवेंद्र मुनेश्वर ( वनपरिक्षेत्र अधिकारी महागाव)( श्री कोल्हे साहेब शेत्र साहेब मुलांना वर्तुळ ) श्री. डी. टी .धुळे वनरक्षक विशेष सेवा महागाव व तसेच दादाराव माहुरे वनरक्षक महागाव अंभोरे वनरक्षक, यादव वनरक्षक, कु.एस.जी. कदम रक्षक भामबीट. कु आर .एम . एम
गीमेकर वनरक्षक करंजखेड वनरक्षक व अन्य वनरक्षक कर्मचारी उपस्थित होते.
