
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
विदर्भातून प्रसिद्ध असलेले हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील भोजाजी महाराजांचे मोठे देवस्थान आहे दर्शनासाठी येथे सर्वधर्मीयांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते पुरणपोळीचा नैवेद्याचा मान भोजाजी महाराजाला असतो हे भोजाजी तुला वंदिते राजे महाराजे महिमा तुझा गाजे या गीता प्रमाणे चिखली येथील एका तरुणाने हुबेहूब भोजाजी महाराज देवस्थान साकारल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राळेगाव तालुक्यातील चिखली ( वनोजा ) येथील सुहास विलास उमाटे या बी फार्म चे शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांनी दहा महिन्याचे अथक परिश्रम घेवून सात फूट लांब व साडे तीन फूट रुंदीचे १३ हजार रुपये खर्च करून खर्डा पासून जसे च्या तसेच भोजाजी महाराज देवस्थानची प्रतिमा सुंदर व आकर्षक बनविले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुहासने निश्चय केला की आपणही खर्डा पासून जसे च्या तसे भोजाजी महाराज यांचे देवस्थान बनवावे व त्यांनी जिद्द व चिकाटीने भोजाजी महाराज देवस्थान बनवायला सुरवात केली आणि ते पूर्णही केले .खर्डा पासून बनविलेल्या देवस्थानला सर्व रंग रंगोटी त्यामध्ये आकर्षक अशी लायटिंग सुद्धा लावण्यात आली या बनविलेल्या देवस्थानची प्रतिमा आजनसरा येथे सुहास ने भेट दिली या बनविलेल्या देवस्थानची प्रतिमा एवढी सुंदर व आकर्षक असल्याने येथील दररोज येणारे भाविक भक्त खर्डाचे बनविलेल्या देवस्थानच्या प्रतिमेला पाहून आनंद व्यक्त करीत आहे.
दहा महिने अथक परिश्रम घेवून भोजाजी महाराज देवस्थानची खर्डा पासून बनविलेली आकर्षक व सुंदर अशी प्रतिमा सुहास विलास उमाटे यांनी आजनसरा येथे भेट दिली असून येथील भोजाजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी भोजाजी महाराज देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विजय पर्बत सचिव शिवदास पर्बत व सदस्य नरेश आस्टनकार पुजारी अभिनव चतुर्वेदी यांच्यावतीने सुहास विलास उमाटे या विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
