
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी या राळेगाव तालुक्यातील विकास कामांच्या भूमिपूजनाकरिता आल्या असतात तेजनी येथील कोराई गोराई देवी दर्शन दरम्यान आदिवासी समाज बांधवांनी खासदार भावनाताई गवळी यांना निवेदन दिले.
निवेदन देते वेळी, किरण कुमरे सरचिटणीस काँग्रेस कमिटी यवतमाळ, संदीप पेदोर, नरेश गेडाम, दिलीप कनाके, सुरेश कनाके, जिवन मेश्राम, देविदास माजी सरपंच, आंजी सरपंच ताराबाई सोयाम, रमेश पेंदाम, नाना कोवे, आदी समाज बांधव उपस्थित होते.
खरे लाभार्थी विविध योजनेपासून वंचित
निवेदनातून धनगर समाज यांना आदिवासींमध्ये समाविष्ट करु नये तसेच बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकावल्या तसेच बोगस असलेले आदिवासी खऱ्या आदिवासींच्या विविध योजनांचा लाभ घेत असुन खऱ्या आदिवासी लाभार्थ्यांना या विविध योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. आशयाचे निवेदन, खासदार भावनाताई गवळी यांना दिले आहे.
