सण आणि उत्सवानिमित्त स्वयंघोषित समाजसेवकाला येतो आहे चेव


प्रतिनिधी:प्रवीण जोशी
यवतमाळ


सध्या गणपती उत्सवानिमित्ताने अनेक गणेशमंडळांनी समाजाला बोधक उत्कृष्ट असे कार्यक्रम घेऊन उत्सवाचा एक वेगळा आदर्श सर्वसामान्या पुढे ठेवला असून येणाऱ्या काळामध्ये या स्तुत्य अशा कार्यक्रमाचा वसा पुढे चालू ठेवून चालू असलेली गणेश उत्सवातील ज्ञानवर्धक आणि सकारार्थी विचार वाढवून समाजाची प्रगती कशा प्रकारे होईल अशा कार्यक्रमाची रूपरेषा आखून चालत आलेली परंपरा जपतील एवढे नक्की. तसे बघता येणाऱ्या काळात निवडणुका असल्याकारणाने अनेक राजकीय मंडळी गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आपला पुढील हेतू आणि दिशा ठरवितांना दिसत आहे तत्कालीन काळात इंग्रजांच्या दडपशाहीला जनता उबगली असताना विविध नवनवीन कायद्याची निर्मिती करून आपल्या प्रस्थापित असलेल्या साम्राज्याला आणि सत्तेला कोणी धक्का व ललकारणार नाही अशा प्रकारचे किचकट कायदे आणून सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत होते व जनता जागृत होऊन व एकत्रितपणे संघर्ष करून असलेल्या दडपशाहीला झुगारून व गुलामीला आळा घालण्यासाठी हा उत्सव उभा ठाकला व तो आता मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना अनेक स्वयंघोषित समाजसेवकांची जणू मान मानदियाळी बघायला मिळत आहे निवडणूक जवळ येत असताना माझ्याकडे अनेक तरुणांचा फौजफाटा असून मी म्हणेल ते तरुण करू शकतात हे दाखविण्याचा आटापिटा या निमित्याने समाजसेवक करताना दिसत आहे पण आपला हेतू साधण्यासाठी तरुणांना एकत्र करून त्यांची माती भडकवून त्यांना कायद्याच्या कचाट्यात अटकून आणि आपण मात्र सुरक्षित राहून तुम्ही चला पुढे मी आलो मागून अशी अपप्रवृत्ती असणाऱ्या व चमकोगिरी करणाऱ्या समाजसेवकाची रेलचेल सध्या बघायला मिळत आहे सर्व आंतरिक व तात्विक शिकवण आणि संस्काराच्या मोठमोठ्या गप्पा छाटणाऱ्या समाजसेवक पैसा सावडण्याचा आणि कलेक्शनची वेळ आली म्हणजे हे सगळे बासनात गुंडाळून ठेवतो अशी अपप्रवृत्ती फोफावताना दिसत आहे. पण समाजातील स्वयंघोषित सेवकांना आता तरुणांनी ओळखले असून या अशा लपुट समाजसेवकाच्या मागे लागल्याने व धावतगेल्याने कशा प्रकारची हानी होते हे चांगल्या प्रकारे ओळखून आहे हे विशेष तसेच अशा संधीसंधान लोकांना चमकोगिरी व माझ्यामागे जनता किती आहे हे दाखवण्याचा उत्तम क्षण असल्याकारणाने नक्कीच असे क्षण समाजसेवकाकडून चुकणार नाही जास्तीत जास्त मर्कटलीला आणि वळवळ चळवळ कसंतरी काहीतरी यावेळी समाजसेवकाकडून बघायला मिळेल असे तरी दिसते लोकांच्या व धर्माच्या नावावर आपले इमले जूमले बांधून ज्या विचारात जडणघडण झाली त्या विचाराला बाजूला सारून प्रगती व पैशाच्या अधिकच्या मोहपाशात समाजसेवकाची नीतिमत्ता गुंतलेली असताना तुम्ही पुढे व्हा मी आलोच म्हणणाऱ्या समाजसेवकाचे मनसुबे आता जनतेने व तरुणांनी ओळखले असून ती आता समाजसेवकाच्या मागे धावणार नाहीत एवढी नक्की.