राळेगाव न्यायालयात दिवाळी मिलन कार्यक्रम संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुका वकील संघ तर्फे दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला, यात न्यायालयीन परिसरात रांगोळी काढून सर्व दूर दीप प्रज्वलन करण्यात आले व मुख्य ठिकाणी समई प्रज्वलित करून परिसर प्रकाशित करण्यात आला, खरे तर न्यायालयाचे संपूर्ण वातावरण प्रफुल्लित झाले होते व सर्वदूर दिव्यांचा प्रकाश झाला होता, बार रूम मध्ये दोन्ही न्यायाधीश साहेबांना आमंत्रित करून दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या, त्यावेळी प्रमुख न्यायाधीश वि. वी. जटाळ साहेब, न्यायाधीश डी. आर. कुळकर्णी साहेब, वकील संघाचे अध्यक्ष ॲड प्रितेश वर्मा, सचिव ॲड गायत्री बोरकुटे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड मंगेश बोबडे, ॲड किशोर मांडवकर, ॲड मधुसूदन अलोने, ॲड मोहन देशमुख, ॲड वैशाली मोंढे,ॲड रोशनी वानोडे,ॲड आकाश कवडे,ॲड वैभव पंडीत, ॲड वैष्णवी मुके,ॲड रुपेश सागरकर, ॲड शुभम नरमशेट्टीवार, ॲड संजय धुपे, ॲड दीपक जुमनाके, कोर्टाचे सर्व अधिकारी तथा कर्मचारी व वकिलांचे सर्व सहाय्यक उपस्थित होते सर्वांना दिवाळी निमित्त शुभेच्छा देऊन कार्यक्रम पार पडला.