
राणी दुर्गावती चौक प्रभाग क्रमांक १ राळेगांव येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या प्रसंगी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना मा. अरविंद केराम, यांनी बिरसा मुंडा यांचे आंदोलन हे फक्त आदिवासी समाजासाठी नसून इथल्या सर्व बहुजन समाजासाठी होते.इंग्रजांच्या जुलमी व्यवस्थे विरुद्ध लढताना बिरसा मुंडा यांना वयाच्या २५ व्या वर्षी मारण्यात आले. असे मनोगत व्यक्त केले या जयंतीची सुरूवात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला व क्रांतिवीर बाबुराव शेडमाके विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या तैलचित्रा पुष्प मला अर्पण करून करण्यात आली.यावेळी राळेगांवचे प्रथम नागरिक रवींद्र शेराम, नगराध्यक्ष नगरपंचायत राळेगांव माजी नगरसेवक काशिनाथ तोडासे, राळेगांवचे शिवसेना शहर प्रमुख विनोद काकडे उबाठा, उपशहर प्रमुख राकेश राहुळकर ,रामचंद्र मेश्राम सेवा निवृत्त तलाठी,
सामाजिक कार्यकर्ते नानाजी कोवे, नानाजी सिडाम, अंकुश कुमरे, मनोहर कुडमते, मारुती उईके, अनुराग मरसकोल्हे, राजेश्वर मडावी, यांच्यासह सर्व समाज बहुसंख्येने उपस्थित होते.
