
दि १९ नोव्हेंबर रोजी गुजराती समाजाचे आराध्य दैवत श्री संत जलाराम बाप्पा यांची २२४ वी जयंती तालुक्यातील एकविरा मंडळ बसस्थानक चौक वडकी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
.
ह्यावेळी सकाळच्या सुमारास श्री जलाराम बाप्पाचे मूर्ती पूजन
होऊन बाप्पाची आरती करण्यात आली. जयंती निमित्त बसस्थानक परिसरात दुपारी २ ते ५ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. ह्यावेळी जलाराम बाप्पा ऊत्सव समितीच्या वतीने गावातील प्रतीष्ठीत नागरीक आमंत्रित लोकांचे उपस्थितीत राळेगाव चौफुलीवर असलेल्या उड्डाणपुलाखाली भजन किर्तनांनी व आकर्षक अश्या फुलांनी सजवून बाप्पा यांची प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले. यावेळी गूजराती समाजबाधंव यांचे
मार्गदर्शनाखाली महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यामधे शेतकरी कष्टकरी व्यापारी मंडळी तसेच सगळ्यानी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने जलाराम बाप्पा भक्त गुजराती समाज बांधव व एकविरा दुर्गोत्सव मंडळाचे सर्व सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
