
देशात व राज्यात राजकारणाचा दर्जा अतिशय घसरला असून तत्व्हीन पक्ष व व्यक्तीच्या हातात सत्ता एकवटल्यामुळे देशातील जनता त्रस्त आहे. देश पुन्हा संपन्न करण्यासाठी व कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे पर्याय आहे. जनतेने या पक्षात सामील होऊन प्रतिनिधी निवडून द्यावेत असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी यवतमाळ येथे केले.
स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा दौरा सुरू असून दि. २२ नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथील विश्रामगृहात पक्षाची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. देशामध्ये जिल्हाबेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, अती करवसुली, शेतकरी आत्महत्या, गुंड – तस्करांचा हिंसाचार, महिलांवरील अत्याचर, अशा अनेक संकटांना सामान्य नागरिक तोंड देत आहे. वर जाती धर्माच्या नावाने संघर्षाच्या पवित्र्यात वीविध समज उभे राहिले आहेत.
भारताने अनेक निवडणुका व विविध पक्षांची सरकारे पहिली. सत्तेत आलेल्या सर्व पक्षांनी समाजाला लुटणारी अकार्यक्षम, भ्रष्ट व्यवस्थाच पुढे चालू ठेवली. याचा परिणाम आजची देशाची दयनीय अवस्था आहे. सर्वच पक्षांनी जनतेचे शोषण करून सतेत टिकून राहण्याच्या प्रयत्न केला, आज ही करत आहेत. पक्षाची विचारधारा, तत्वज्ञान असे काही आता राहिले नाही. ज्या पक्षाला काल पर्यंत शिव्या घातल्या, त्याच पक्षात दुसऱ्या दिवशी प्रवेश करून पद व पैसा मिळवले जात आहे.
ही व्यवस्था भारताच्या जनतेला दारिद्र्य व पारतंत्र्याकडे घेऊन जात आहे. हे थांबविण्यासाठी फक्त सत्तेतील व्यक्ती किंवा पक्ष बदलून उपयोग नाही. देशाची पूर्ण अर्थ व्यवस्था बदलण्याची गरज आहे, कायदा व सुव्यवस्थेचे राज्य स्थापित करण्याची आवश्यकता आहे. अशी व्यवस्था देण्यासाठी थोर अर्थशात्री, शेतकरी संघटनेचे प्रणेते युगत्मा शरद जोशी यांच्या स्वतंत्रतावादी विचाराचा व त्यांनीच स्थापन केलेला स्वतंत्र भारत पक्ष सत्तेत येणे ही काळाची गरज आहे. कायद्याचे राज्य, भ्रष्टाचार करण्यास किमान संधी, किमान कर प्रणाली, उत्तम शिक्षण व मुबलक रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, उद्योग व्यवसाय करण्यास सुलभता तसेच लायसन परमिट व्यवस्थेच्या जाचातून सुटका व प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आपल्या प्रतिभेचा विकास करण्यास वाव देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी आज स्वतंत्र भारत पक्षा शिवाय पर्याय नाही. यासाठी स्वतंत्र भारत पक्ष मजबूत करण्याची गरज आहे असे मत अनिल घनवट यांनी व्यक्त केले.
यवतमाळ जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा त्रास थांबविण्यासाठी जानेवारी महिन्यात आंदोलन उभे करण्यात येईल असे स्व भा प चे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी जाहीर केले. बेरोजार तरुणांना संघटित करण्यासाठी शहरात मेळावे घेऊन प्रबोधन करण्यात येईल असे स्व भा पच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणल्या.
स्व भा प च्या जिल्हाध्यक्ष पदावर देवराव धांडे याची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस शेतकरी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रज्ञाताई बापट, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष,राजेंद्र झोटिंग, मिलिंद दामले शेतकरी संघटना विज्ञान व तंत्रज्ञान विस्तार आघाडी प्रदेशाध्यक्ष, प्रवक्ता विजय निवल,विशंबर भानुसे कृष्णराव भोगांडे दिपकअन्ना आनदवार, देवेंद्र राऊत,गोपाल भोयर,अक्षय महाजन, चंद्रशेखर देशमुख, गजानन ठाकरे,होमदेव कन्नाके सोनाली मरगडे अशोक कपीले, मधुसूदन कोवे, बबनराव चौधरी, भास्कर महाजन, बबनराव ठाकरे, हिम्मत देशमुख, श्रीधर ढवस, जयंत बापट आदी उपस्थित होते.
