
राळेगाव तालुक्यातील खैरी येथील एका मोबाईलच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली.या आगीत दुकानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुर्णतः जळून खाक झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युवकांना मोठी मेहनत घ्यावी लागली होती.हि घटना २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता दरम्यान घडली.
तालुक्यातील खैरी येथील वैभव सरोदे यांच्या मालकीचे वैभव मोबाईल शाॅपी नामक गावाच्या मध्यभागी मोबाईल दुरुस्ती तथा इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे दुकान असुन २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले.दरम्यान रात्री आठ वाजताचे सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणात आगीचा धूळ निघत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी विशेषतः मंगेश सरोदे या युवकाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.या आगीत सदर दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण कळू शकले नाहीत.या मोबाईल दुकानाला लागुन असलेल्या एका काॅप्यूटरच्या व टेलरच्या दुकानाला या आगीची झळ बसली.या घटनेची माहिती मिळताच वडकीचे ठाणेदार विजय महाले तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.