अनलॉक चा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील:मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

राज्यभरातील कोरोना रुग्ण कमी होत असताना राज्यभरात अनलॉक होईल अशी चर्चा सुरू होती.चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील18 जिल्हे उद्यापासून अन लॉक करणार असल्याचे सांगितले होते.परंतु तासाभरात हा निर्णय मागे ?
अन लॉक करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही .जनसंपर्क विभागानुसार अनलॉक करण्याबाबत मुख्यमंत्री आदेश देतील असे सांगण्यात आले आहे.तसेच उद्या किंवा परवा मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
