
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मागील महिन्यात दहावी बारावीचा निकाल लागले असून दहावी आणि बारावी च्या अंतिम परिक्षेत विद्यार्थी विद्यार्थीनींच्या मिळालेल्या भरघोस गुणांचे शिलेदार फक्त खाजगी शिकवणी वर्ग वाले म्हणा की क्लास वाले चं का?असा संतप्त सवाल आता जनसामान्यांच्या चर्चेअंती ऐकावयास मिळत आहे हे विशेष.
राळेगांव शहरात आठ ते दहा खाजगी शिकवणी वर्ग आहे.तर तालुक्यात खाजगी मध्ये “ट्यूशन्स” घेणारे अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत.यातील बऱ्याच जणांचा “परफाॅरमन्स” उत्कृष्ट आहे हे पालक चं अभिमानाने सांगत असतात.
राळेगांव शहरात व तालुक्यात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक नामावंत शाळा पन्नास ते पंचवीस वर्षापासून असून शंभर टक्के निकालाची परंपरा सातत्याने टिकवून ठेवणाऱ्या आहे. या मधील प्राचार्य,मुख्याध्यापक,
शिक्षक,शिक्षिका यांच गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनीं च्या भरघोस गुण मिळविण्यासाठी यांचे प्रयत्न कारणीभूत नाही का?
शाळा मग ती जिल्हा परिषदेची असो खाजगी शासनमान्य असो ग्रामीण भागात ही दर्जेदार शिक्षण मिळत च आहे हे अनेक गोर गरीब गरजवंताच्या पाल्यांनी पैकी च्या पैकी गुण प्राप्त करुन वेळोवेळी दाखवून दिले आहे.
सध्या राळेगांव शहरात खाजगी शिकवणी वर्ग वाल्यांचे जागोजागी होर्डींग्स,घरोघरी वर्तमानपत्राद्वारे रंगीबेरंगी पत्रके टाकून,या मधील मजकूरा मार्फत ही सर्व फोटो मधील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनीं ना मिळालेले भरघोस यशाचे धनी फक्त आम्ही च आहो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न तर करत नाही ना?अशीही शंका जनसामान्यांच्या मनात येत आहे. हा एक व्यवसाय आहे हे मान्य पण संपूर्ण श्रेय एकट्याने लाटू नये एवढिच अपेक्षा आहे.
विद्यार्थी, विद्यार्थीनी मुळात बुध्दीवान असले, आणि पालकांच्या देखरेखीखाली असलं तर यश हमखास पणे मिळतंच.
या मध्ये पालक,शाळेतील शिक्षक वृंद नंतर शिकवणी वर्ग वाले असा क्रम असतोय. यशाचे अनेक धनी असतात मग शिकवणी वर्ग वाले कमी गुण मिळाले तर त्याचं खापर विद्यार्थ्यांवर पालकांच दुर्लक्ष अशी कारणे सांगून नामनिराळे होतात अशी खूप उदाहरणे शहरात व तालुक्यात आहेत.
