वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या, इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या दोन पत्रकार यांच्यावर भ्याड हल्ला

  • Post author:
  • Post category:इतर

माईक, कॅमरा,हल्ले खोरांनी लुटले, सुदैवाने पत्रकार प्रतिनिधी वाचले!

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत काळी दौलत खान येथे शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी दुःखद घटना घडली या घटनेत एका युवकाचा निर्घुण खून करण्यात आल्याने पुसद येथील आमदार निलय नाईक तसेच आमदार इंद्रनील नाईक घटनास्थळी गेल्याची बातमी कळताच पुसद येथून मुकाबला न्यूज २४ ची टीम बातमी संकलन करण्या करिता काळी दौलत खान येथे पोहोंचताच तिथे जमले ४० ते ५० लोकांनी मुकाबला न्यूज २४ चे अँकर सैय्यद फैजान आणि जय महाराष्ट्र चॅनल चे प्रतिनिधी संदेश कान्हू या दोघांवर शुक्रवार च्या रात्री अंदाजे ८ वाजताच्या सुमारास अचानक पणे भयाड हल्ला करून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्त्यावर हजर पोलिसांच्या तत्परतेने हल्ले खोरांच्या तावडीतून सैय्यद फैजान आणि संदेश कान्हू यांची सुटका करण्यात आली मात्र हल्लेखोरांनी सैय्यद फैजान यांच्या जवळील बॅग, त्यामध्ये सैय्यद फैजान यांचा कॅमरा, माईक, रोख रक्कम आणि कागदपत्रे तसेच बुमआयडी लुटले यावेळी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी देखील हल्ले खोरांना पांग विले यामुळे सुदैवाने संदेश कान्हू आणि सैय्यद फैजान यांचा बाल बाल जीव वाचला.