दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधानांना पत्र


सहसंपादक:प्रशांत विजय बदकी
कोरोना च्या बिकट परिस्थितीत स्वतःच्या जीवाची चिंता न करता रुग्णसेवेत झटणाऱ्या डॉक्टर ,नर्सेस ना देशाचा सर्वात महत्वाचा असलेला भारत रत्न या अवॉर्ड ने सन्मानित करावे अशी विनंती दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे .
कोरोना काळात लढत लढत शहीद होणाऱ्या डॉक्टर, नर्सेस ना भारत रत्न देऊन त्यांचा सन्मान केल्यास हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असेही पत्रात अरविंद केजरीवाल यांनी नमूद केले आहे.जर एका सामूहिक गटाला भारत रत्न देण्याची तरतूद नसेल तर तशी तरतूद करण्याचे देखील त्यांनी सुचविले आहे.
