
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले साक्री तालुक्यातील कुत्तरमारे गांवचे सरपंच भास्कर पवार यांची ट्रायबल फोरम साक्री
तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे.
ट्रायबल फोरम हे संघटन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे. वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कँडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये नियुक्ती झाल्यामुळे तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे.
