
गेल्या एक वर्षांपासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने मृत कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करता यावा यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मोफत पीपीई किट चे वाटप अविरत सुरू आहे.या उपक्रमाची दखल घेत शहीद प्रकाश विहिरे यांच्या पत्नी व मुलीने मनसेला संपर्क करीत या निस्वार्थ सेवेचे कौतुक करत शहीद प्रकाश विहिरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ५१ पीपीई किट मनसेला देण्याचा मानस व्यक्त मनसेला एक मदतीचा हात म्हणून आज त्यांनी ह्या किट जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या सुपूर्द केल्या.
शहीद प्रकाश विहिरे हे सण २००४ मध्ये जम्मू काश्मीर येथील हल्ल्यात शहीद झाले होते. मनसेने आज पर्यंत १५००पीपीई किट चे मोफत वाटप केले असून आज जिल्ह्यात सर्वत्र मृत्यू चे तांडव सुरू आहे, जनता लॉकडाऊनमुळे त्रस्त आहे.अनेक लोकांचे रोजगार गेलेत,अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत अश्या परिस्थितीत अंत्यसंस्कार करायचे तरी कसे आणि जर करायचे म्हटले तर पीपीई किट बाजारात १००० रुपयाला मिळत आहे असा यक्ष प्रश्न उभा राहत आहे या विषयाचे गांभीर्य ओळखूनच मनसेने गेल्या एक वर्षा पासुन आपल्या इतर समाजिक उपक्रम त्यात धान्य वाटप, शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे, शहरात फवारणी, मोफत मास्क ,सॅनेटायझर, हँडवॉश चे वाटप , मोफत भोजन वाटप, यासह अनेक उपक्रम राबविले अश्यातच रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांचा अंत्यसंस्काराच्या हक्क मिळवून देण्यासाठी मनसे पुढे सरसावली मनसेने आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचा अंत्यसंस्काराची जबाबदारी घेत सर्व कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पीपीई किट देण्याचा उपक्रम सुरू केला जो मा.राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत सुरू आहे.मनसेने या उपक्रमासाठी समाजातील प्रतिष्ठित तसेच सामाजिक बांधिलकी असणाऱ्या समाज बांधवानी पुढे येण्याचे आवाहन या प्रसंगी देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी केले.या प्रसंगी प्रामुख्याने शहीद प्रकाश विहिरे यांची पत्नी सुनीता विहिरे, आणि मुलगी भारती विहिरे व मनसेचे विकास पवार, अमित बदनोरे, संजय देठे, अभिजित नानवटकर व इतर पदाधिकारी व शहीद विहिरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
