

ना भाला ना बरची ना घाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे……
या प्रसिद्ध गाजलेल्या गाण्या प्रमाणे सिडकोतील के .बी. एच. विद्यालयातील कलाशिक्षक संजय जगताप सरांनी रक्तातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र निर्मिती करून त्यांना एक अनोळखी भावस्पर्शी मानवंदना दिली कलाशिक्षक संजय जगताप सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे सुद्धा चित्र रक्ताने काढून त्यांना सुद्धा मानवंदना दिली होती आता पर्यंत रक्ता ने व कलर ने डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मोठ्या प्रमाणात चित्र काढलेले आहेत. संजय जगताप सरांनी आता पर्यंत चित्रकलेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहे.चिमणी बचाव..वाघ बचाव..अनेक राष्ट्रीय ,सामाजिक, राजकीय ,क्रांती कारक देवतांचे यांचे चित्र रेखाटले आहेत….पर्यावरण पूरक शाडूमातीपासून गणपती..पर्यावरण पूरक आकाश कंदील, पतंग असे अनेक उपक्रम सर विद्यार्थ्यांन साठी घेत असतात या सर्व उपक्रमासाठी संस्था चालक ,मुख्यध्यापक ,शिक्षक वर्ग, व घरातील सर्व कुटुंब मिञ परिवार नेहमी सराना कौतुक व मदत करत असतात
