

प्रतिनिधी :- ” संजय जाधव.”
विदर्भ व मराठवाडा जोडणाऱ्या सीमावर्ती भागातून पैनगंगा नदी वाहते,त्यावर पिंपळगाव टाकळी कोल्हापुरी बंधारा असून पाणी साठवणूक क्षमता 3.46 द.ल.घ.मी.आहे. विदर्भ मराठवाड्यातील उमरखेड आणि हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील 15 गावाचा पाणी प्रश्न उद्भवणार. हजारो शेतकऱ्यांच्या भाग्यविधाता बंधारा येत्या आठ दिवसात पूर्ण रिकामा होण्याची शक्यता असून पाटबंधारे विभागाचे आणि आपत्ती निवारण समितीचे अक्षम दुर्लक्ष शेतकऱ्यांना भोवणार आहे.
शासन दरबारी निवेदन आणि तक्रार देऊन अजून पाणी गळती थांबली नाहीय. उन्हाळ्यापर्यंत फक्त मनस्ताप करण्याची पाळी शेतकरी आणि प्रशासनावर येणार. अगोदरच इसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यात पूर्ण भरलेला बंधारा रिकामा झाला तर पुन्हा भरण्याची शक्यता नाही. त्यामुळे यावर्षी चा रब्बी व उन्हाळी पिकांच्या, जनावरांच्या, वन्य प्राण्यांच्या ,१५ ते २० गावातील पाणी पुरवठा योजना येथील पाण्याचा प्रश्न येरणीवर येण्याची दाट शक्यता आहे. या भागात पुढे पैनगंगा अभयारण्य आहे त्यामुळे जंगल परिसरातील पाण्याचा मोठा प्रश्न यापुढील काळात तयार होणार आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या परीने गेट मधून होणारी गळती थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. भोकर पाटबंधारे विभाग यांच्या कडून अधिकारी येऊन तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न झाला. तोही यशस्वी झाला नाही. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना प्रहार संघटने तर्फे निवेदन दिले. नदीच्या दोन्ही भागातील आमदार आणि खासदार यांना माहिती मिळाली असून अजून तरी कुणीही गांभीर्य दाखवलेलं नाही. येणाऱ्या काळात नदी किनाऱ्यावरील २० ते २५ गावांना पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.
