
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सोनामाता हायस्कूल चहांद येथे माननीय उपशिक्षणाधिकारी गोडे साहेब शिक्षण विभाग यवतमाळ जिल्हा यांनी सदिच्छा भेट दिली उपशिक्षणाधिकारी तसेच राळेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी देवळे मॅडम, या तालुकास्तरीय शिक्षण परिषदेला जिल्हा परिषद शाळा चहांद येथे आले असताना त्यांनी सोनामाता हायस्कूल शाळेची पाहणी केलीउपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच यावर्षी सोनामाता हायस्कूल चहांद येथे तयार करण्यात आलेल्या परसबागेला राळेगाव तालुक्यातून उत्कृष्ट परसबाग म्हणून प्रथम पुरस्कार मिळाला यानिमित्त परसबागेत सुद्धा पाहणी केली.सोनामाता हायस्कूल येथील परिसर स्वच्छ, सुंदर व प्रसन्न होता. मुख्याध्यापक आदरणीय श्री अनिल धोबे सर आणि त्यांच्या कर्मचारी वर्ग यांचे समवेत परसबागेतील फळभाज्या, पालेभाज्या, फुलझाडे यांची पहाणी केली. धानोरा केंद्रातील संपूर्ण राळेगाव तालुक्यातील एकमेव सर्वांत मोठी आणि सुंदर सोनामाता हायस्कूल येथील परसबाग ही राळेगाव तालुक्यातील प्रथम क्रमांकाची परसबाग आहे.एकंदरीत येथील कार्यकुशल मुख्याध्यापक श्री धोबे सर, आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
