
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायत कार्यालयात संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली धानोरा ग्रामपंचायत चे उपसरपंच विशाल येनोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य विजय चकोले ,अविनाश घोडे, सौ रेखा देवतळे, शुभांगी गुजरकर, ललिता उराडे, अर्चना जुमनाके, सौ कुळसंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी गावातील रामू पोटभरे, अरविंद नेहारे, अंकुश कुंभलकर, प्रीतम घीणमिने , शंकर ईखार यासह अनेक नागरिक उपस्थित होते तसेच डाकघर धानोरा येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यात ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग कुमरे, राजू नेहारे यांनी कार्य केले.
