माजरी गावातील रस्त्यावर जड वाहनावर बंदी

भद्रावती तालुक्यातील माजरी येथील सर्व रहिवाशांना महत्वाची माहिती माजरी पोलीस ठाण्याच्या ठाणेदार १०/०१/२०२५ रोजी मुख्य सूचना जारी केली आहे ज्यात माजरीमध्ये नवीन रस्ता बांधण्यात आला आहे . त्या रस्त्यावर जड वाहने चालवता येणार नाहीत.

बैठकीत, माजरी येथील शांतता समिती सदस्य आणि व्यापारी संघटनेचे सदस्य, पाटाळा माजरी येथील तंटा मुक्ती अध्यक्ष , ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पोलीस पाटील आणि माजरी येथील पत्रकार, त्यांच्या उपस्थितीत ठाणेदार अमित कुमार पाडे यांनी बैठक आयोजित केली. बैठकीत त्यांनी वाहतूकदारांना स्पष्टपणे सांगितले की, माजरी येथील पीडब्ल्यूडी रस्त्याची क्षमता ८ टन आहे. त्यावर जड वाहने चालवता येत नाहीत. रस्त्यांवर सतत जड वाहनांची वर्दळ असतात. शाळेतील मुलांसाठी शाळेत जाताना रस्ता ओलांडताना धोकादायक आहे.