चिल्लीत स्त्री जातीचे अभ्रक आढळले



महागाव तालुक्यातील चिल्ली (इ) येथे आज सुमारे १२ वाजताच्या सुमारास एक स्त्री जातीचे अभ्रक सांड पाण्याच्या नालीत मृत अवस्थेत आढळले.
येथील वार्ड क्रं ३ मधील सांडपाण्याच्या नालीत आज १२वाजताच्या सुमारास स्त्री जातीचे अभ्रक वय ६ महिने अंदाजे आढळल्या गावात विविध चर्चांना उधाण आले आहे. सदर प्रकार हा प्रेम प्रकरणातून झालेल्या गर्भधारणेचा प्रकार असल्याने गर्भपात केल्याचे जनतेतुन बोलल्या जात आहे. त्यामुळे गावात कोणी बाहेरुन नविन आले का? किंवा गावात कोणी लपुन छपुन गर्भपाता सारखा गंभीर गुन्हा करतो का? हे शोधुन गुन्हेगाराला शिक्षा देण्याचे आव्हान पोलिस प्रशासना समोर आले आहे.
घटनेची फिर्याद पोलिस पाटील यांनी पोलिस स्टेशनला दिल्या नंतर जमादार निलेश पेंढारकर हे घटना स्थळी पोहचुन पंचनामा करुन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला.