
सहसंपादक: रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठण करण्याबाबत पालक सभेचे आयोजन मा . श्री जयंतराव कातरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती येरला यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा घेण्यात आली .पालक सभेला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .पालक सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश बारापात्रे यांनी केले त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठण करण्याबाबत सदस्य निवडीच्या नियमावलीचे माहिती सांगितली तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्याची माहिती सांगितली . व नियमानुसार शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठण सभा पार पडली या सभेमधून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून श्री जयंतराव कातरकर ,श्री मनोहरराव कडवे , श्री अनिलराव तागडे ,श्री उत्तमराव चापडे, श्री .दिनेशराव आत्राम , सौ.ज्योतीताई आत्राम, सौ. सुवर्णाताई सालेकर , सौ.शुभांगीताई ठाकरे , सौं .अनिताताई वाघमारे या सदस्यांची पालक सभेतून बहुमताने निवड करण्यात आली सर्व निवडून आलेल्या सदस्यांमधून श्री जयंतराव कातरकर यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून व श्री मनोहरराव कडवे यांची शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष म्हणून बहुमताने निवड करण्यात आली .तसेच निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी सर्वांचे आभार मानले .श शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठण निवडीची प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक अंकुश बारापात्रे व सहाय्यक शिक्षिका कु . लता पाल यांनी पार पाडले तसेच मुख्याध्यापकांनी सर्व पालकांचे मनःपूर्वक आभार मानले .
