जि. प. उ. प्रा. केंद्र शाळा खैरी येथे सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व आनंद महोत्सव साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वडकी: राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जि. प. उ. प्रा. केंद्र शाळेत सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व आनंद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ वैशाली दोडके, कार्यक्रमाचे उद्घाटक रीता निंबुळकर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उमेद महिला समन्वयक सौ अर्चना चंहुजवार, कविता वासेकर, शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य उमेश भारशंकर, सरला ताई गवारकर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सर्व संचलन हे इयत्ता तिसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले.
सर्व प्रथम सावित्रीबाई यांचे प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे रोपटे चिमुकल्यांच्या मनात रुजावे याकरिता मान्यवरांनी सावित्रीबाईंचे शिक्षणा विषयी असलेले विचार व त्यांची थोरवी विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केली. या कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या शिक्षक वृत्तीचे वर्णन व स्त्री शिक्षणाची महती समाज मनात रुजवताना झालेला त्रास आणी समाजा विरुद्धच्या लढ्यात त्या कश्या यशस्वी झाल्या याचे वर्णन विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सादर केले सोबतचअनेक विद्यार्थ्यीनींनी सावित्रीबाईंची सुंदर अशी वेशभूषा साकारली. यावेळी वर्ग १ते८ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनी भाषणे दिली.
सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वावर उभे व्हावे यासाठी आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यावसायिक स्टॉल उभारून प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ स्टॉलवर ठेवून त्याची विक्री केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाबद्दल शाळेतील शिक्षकाकडून मार्गदर्शन करण्यात आले. अशा रीतीने हा सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन व आनंद महोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे संचालन वर्ग तिसरा चे विद्यार्थी दीक्षांत वनकर व पवन डफरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणराज दोहतरे या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी चिमुकल्यांना मोलाचे मार्गदर्शन शाळेच्या शिक्षिका सौ सरोज शेंडे, योगिता धोटे शिक्षक राजकुमार शिंदे, प्रवीण दीडपाये, महेंद्र कौरती, राजेंद्र दुरबुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.