भावीक भगत हेल्प फाउंडेशनच्या वतीने रोजगार निर्मिती मार्गदर्शन शिबिर



उमरखेड येथे भावीक भगत फाउंडेशन च्या वतीने रोजगार व्यवसाय निर्मितीसाठी भव्य मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांच्या हाताला काम कसे मिळेले यासाठी मेळावा घेण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये हिंगोली येथे स्किल इंडियाच्या माध्यमातून कार्यशाळेच्या उद्घाटन करणार असल्याचे मत हिंगोली लोकसभेचे भावी खासदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले तसेच पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये उंमरखेड या ठिकाणी सुद्धा स्किल सेंटरची उभारणी आणि गरजू त्यांना मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे मत व्यक्त केले. यवतमाळ जिल्ह्यातील महिलांसाठी हळद पावडर व मसाले पदार्थ बनवणे यासारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी बँकेकडून अर्थसहाय्य भावी भगत हेल्प फाउंडेशन च्या माध्यमातून मदत करत असल्याचे भावी भगत यांनी व्यक्त केले. हेल्प फाउंडेशन च्या वतीने मदत करण्यात येत आहे कार्य बद्दल भाविक भगत यांची कौतुक श्रीकांत पाटील यांनी केले.
भाविक भगत हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील रुग्णांची 24 तास सेवा करताना या सेवेबद्दल भावी भगत यांचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी उटी गावाचे सरपंच पंजाबराव वानखेडे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिता श्रीकांत पाटील श्रीकांत पाटील चंद्रवंशी हे होते त्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेल्प फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष अनुप शेखावत यांनी केले.