मैदानी खेळ सांघिक भावना, संस्कृतीचे जतन करण्याचे माध्यम- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे, सास्ताबाद येथे विदर्भस्तरीय कबड्डी सामन्याचे आयोजन


हिंगणघाट तालुक्यातील सास्ताबाद येथे विदर्भस्तरीय खुल्या गटातील कबड्डी सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे व कृ.उ.बा.सचे सभापती ऍड.सुधीर कोठारी उपस्तीत राहुन मार्गदर्शन केले व गावातील नागरिकांशी संवाद साधला तसेच सर्व सहभागी खेळाडूना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आयोजक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला
त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित सरपंच सौ.रमाबाई शंभरकर,उपसरपंच सौ.कलावतीबाई हिवंज,तंटामुक्ती अध्यक्ष गजाननजी राऊत, ग्रा.प सदस्य हनुमानजी चावरे, जि.प शिक्षक गणवीर सर, जि.प शिक्षक पारसे सर, अध्यक्ष वि.का.स.सो डॉ.सुधाकरराव वेले, पोलीस पाटील रत्नपाल म्हैसकर, माजी पोलीस पाटील विनायकरावजी चौधरी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्रभाऊ माटे, माजी अध्यक्ष वि.का.स.सो महादेवरावजी चौधरी, माजी सरपंच डॉ.विनायकरावजी ठाकरे, माजी सरपंच शंकररावजी कुमरे, माजी सरपंच योगेश्वरराव चौधरी, माजी सदस्य भालेरावजी येरकुडे, शिक्षक वाल्मिकरावजी कोकाटे, सुरेशराव गुळघाणे, नुसारामजी कुमरे, हेमराजजी भालकर, महेशजी महाराज चौधरी, संजुभाऊ क्षिरसागर तसेच मंडळाचे अध्यक्ष निलेशभाऊ वेले, उपाध्यक्ष हनुमानजी चावरे, सचिव महादेवराव चौधरी आणि आयोजक श्री संत पैकाजी महाराज क्रिडा कार्यकर्ते, खेळाडू व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
माजी आमदार प्रा.राजु तिमांडे मार्गदर्शन करते वेळी म्हणाले की,ग्रामीण संस्कृतीत रुजलेला कबड्डी हा मैदानी खेळ खेळाला आपण सगळ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे तसेच राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू निर्माण होतील.आता कबड्डी हा खेळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जात आहे,जिल्ह्यातील खेळाडू व संघ राष्ट्रीय स्तरावर खेळावे कबड्डी खेळाला चालना मिळावी,प्रसार व्हावा,यासाठी ग्रामीण भागात अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे हे कौतुकास्पद आहे,कबड्डी खेळामुळे तरुणांमध्ये खेळाची आवड तर वाढतेच शिवाय निरोगी शरीर आणि मनही निरोगी राहते.
मैदानी खेळ सांघिक भावना, संस्कृतीचे जतन करण्याचे माध्यम आहे, असे मत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.त्यावेळी आयोजक समितीचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामस्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.