
सहसंपादक: रामभाऊ भोयर
आमदार समवेत तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने खाल्लेल्या बेसन भाकर ला नाही जागले महसूल अधिकारी
मागील वर्षी तालुक्यात आलेल्या महा पुरामुळे सर्व शेतकऱ्यांच्या शेतातून पिके खरडून गेली होती त्यामुळे लागलीच आमदार महोदयांनी सर्व यंत्रणेला सोबत घेवून तालुक्यातून पाहणी दौरा केला होता व चहांद येथे बेसन भाकर चा आस्वाद घेऊन गावातील शेतीची पाहणी केली होती परंतु तलाठी विनोद वाठोणकर व चहांद येथीलच खाजगी ऑपरेटर गोलु चामाटे यांनी गावातीलच शेतकऱ्यांचे नावे वगळून ऑपरेटर च्या घरचेच नावे घेऊन त्यांच्या नावाने 7000 च्या वर रक्कम टाकून यादी बनवली व ज्यांचे शेतीमधून पूर गेला व पिक वाहुन गेले त्यांना अनुदाना पासून वगळून टाकले त्यामुळे काल दि १५-०२-२०२४ पासून चहांद येथील सर्व शेतकरी यांनी ग्राम पंचायत समोर उपोषणाला बसले आहेत•