बोर्डा येथे शेतकऱ्याची विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न ,प्रकृती गंभीर

वणी :प्रतीनिधी नितेश ताजणे

तालुक्यातील बोर्डा येथे एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे. परिणामी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मारोती गजानन पायघन (३८)असे विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मारोती यांनी दि.२८ ऑक्टोंबर ला दुपारी २: ३० ते ३:०० वाजताच्या दरम्यान आपल्या
राहात्या घरी विषारी औषध प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच मारोती ला वणी येथील शासकीय दवाखान्यामध्ये उपचारा करीता नेण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपुर येथे शासकीय दवाखाण्यामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.
सदर इसमाचे नांवे मौजा चिरकुंडा येथे अंदाजे २.४० हे.आर शेतजमीन असल्याची माहिती मिळाली आहे.